black and white bed linen

ग्रामपंचायत अणाव

या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे

*गाव आहे तीन अक्षरी
नांव त्याचे अणाव*

      अणाव हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हयातील कुडाळ तालुक्यात वसलेले एक निसर्गरम्य् आणि शैक्षणिकदृष्टया प्रगत गांव आहे. मुंबई- गोवा महामार्गापासुन 5 किलोमिटर अंतरावर हे गांव आहे. इथला निसर्गरम्य्‍ परीसर जणु पर्यटकांना साद घालीत असतो. शांततेचे आणि ग्रामीण जीवनाचे एक उत्त्म उदाहरण म्हणजे अणाव हे गांव. या गांवाला भौगोलिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे हे तुम्हाला गावाला भेट दिल्यावर नक्की कळेल.

सरपंच
लिलाधर शंकर अणावकर
8007639000
ग्रामपंचायत अधिकारी
प्रदीप रमेश नारकर
94223 88338
उपसरपंच
आदिती अभय अणावकर
85509 09893

अणाव नाविन्यपूर्ण उपक्रम

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत अणाव घाटचेपेड वाडी येथे कच्चे बंधारे / वनराई बंधारे मोहीम उत्साहात राबविण्यात आली..स्थानिक पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी श्रमदानातून मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत पाणलोट क्षेत्र विकासासाठी एकत्रित काम केले...

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत लेक वाचवा देश वाचवा असा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी अणाव हि जिल्हातील पहिली ग्रामपंचायत सरपंच कार्यकालावधीत मिळणारे सरपंच मानधन गावात जन्मनाऱ्या प्रत्येक मुलीस मुदतठेव (FDR) दिली जाणार.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत अणाव महोत्सव २०२५ गावातील स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम जेष्ठ वृद्ध, नागरिकांचा सत्कार, गावातील सर्व मान्यवर ज्यांनी उद्देशनीय कामगिरी केली यांचेही सत्कार या निमिताने करण्यात आले

विविध कामे व उपक्रम

अणाव येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांचे भूमिपूजन व चावी वितरण कार्यक्रम
जागतिक दिव्यांग दीन दिव्यांग व्यक्तींना ५% दिव्यांग निधी वितरित करण्यात आला
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत

सर्व प्राथमिक शाळा तसेच अंगणवाडी डिजिटल करण्यात आले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत परिसरात परस बाग करण्यात आली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत अणाव येथे "सेलिब्रिटी भेट कार्यक्रम"रविवार दिनांक -११/०१/२०२६
अणाव येथे श्री देव रामेश्वर मंदिर व मंदिर परिसर,सर्व प्राथमिक शाळा तसेच अंगणवाडी येथे CCTV बसविण्यात आले.
अणाव येथे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा
स्वच्छता मोहीम
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा -२

चालू घडामोडी