पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण)
ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.


पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN)
लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेती आणि घरगुती गरजांसाठी आर्थिक मदत पुरवली जाते.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा)
ग्रामीण कुटुंबांना आर्थिक वर्षात किमान १०० दिवसांच्या रोजगाराची हमी दिली जाते.

पंतप्रधान पिक विमा योजना
नैसर्गिक आपत्त्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण दिले जाते.

राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (NRLM)
ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना स्वयं-सहायता गट तयार करून त्यांचे सक्षमीकरण करणे.

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)
ग्रामीण भागात शौचालये बांधण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी प्रोत्साहन दिले जाते.

पंतप्रधान कृषी सिंचन योजना
शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी सिंचनाच्या सुविधा पुरवणे.

सिंधुरत्न समृद्ध योजना
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील रहिवाशांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

संजय गांधी निराधार योजना
निराधार व्यक्तींना आर्थिक मदत पुरवली जाते. यात श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना आणि विधवा निवृत्तीवेतन योजना यांचा समावेश आहे.

प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान
तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाते.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य आणि पोषण सुधारणे. पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० थेट बँक खात्यात दिले जातात.

जिल्हा परिषद स्वनिधी योजना
जिल्हा परिषदेमार्फत विविध योजना राबविल्या जातात, उदा. दुधाळ जनावरांच्या खरेदीसाठी ४०% अनुदान.


महिला व बालकल्याण योजना
महिलांना स्वयंरोजगार आणि तंत्र शिक्षणासाठी संधी उपलब्ध करून देणाऱ्या अनेक योजना जिल्हा परिषद राबवते.

उपलब्ध सेवा
जन्म नोंदणी व प्रमाणपत्र
गावाच्या हद्दीत जन्म झाला असल्यास २१ दिवसांच्या आत जन्म नोंदणी केली जाते व प्रमाणपत्र दिले जाते.
आवश्यक कागदपत्रे:
  • अर्ज
  • आई-वडील यांचे आधारकार्ड
  • आशा/अंगणवाडी कार्यकर्ती यांचा अहवाल
  • आवश्यकतेनुसार रुग्णालय कागदपत्रे
प्रक्रिया :
  • जन्म गावाच्या हद्दीत झाला असल्याची खात्री झाल्यावर नोंदणी केली जाते. प्राथमिक आरोग्य केंद्र येथे झालेल्या जन्माची नोंदणी त्याच ठिकाणी केली जाते.
शुल्क: पहिले प्रमाणपत्र मोफत त्यानंतर 20 रुपये
मृत्यू नोंदणी व प्रमाणपत्र
गावाच्या हद्दीत मृत्यू झाला असल्यास २१ दिवसांच्या आत मृत्यू नोंदणी केली जाते व प्रमाणपत्र दिले जाते.
आवश्यक कागदपत्रे:
  • अर्ज
  • मयत व्यक्तीचे आधारकार्ड
  • आवश्यकतेनुसार रुग्णालय/पोलीस स्टेशन कागदपत्रे
प्रक्रिया :
  • मृत्यू गावाच्या हद्दीत झाला असल्याची खात्री झाल्यावर नोंदणी केली जाते.
शुल्क: पहिले प्रमाणपत्र मोफत त्यानंतर 20 रुपये
दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
दारिद्र्य रेषेखालील असलेल्या यादीत नाव असल्यास दाखला दिला जातो.
आवश्यक कागदपत्रे:
  • अर्ज
प्रक्रिया :
  • यादीत नाव तपासून दाखला दिला जातो.
शुल्क: 20 रुपये
नमुना नं 8 चा उतारा
नमुना नंबर 8 मधील स्वमालकीच्या मालमत्तेचा उतारा दिला जातो.
आवश्यक कागदपत्रे:
  • अर्ज
प्रक्रिया :
  • नमुना नं 8 रजिस्टरवरून नाव तपासून उतारा दिला जातो.
शुल्क: 20 रुपये
थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
ग्रामपंचायत करांची येणे बाकी नसल्यास प्रमाणपत्र दिले जाते.
आवश्यक कागदपत्रे:
  • अर्ज
प्रक्रिया :
  • नमुना नं 9 रजिस्टरवरून नाव तपासून प्रमाणपत्र दिले जाते.
शुल्क: 20 रुपये
निराधार असल्याचा दाखला
कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूनंतर कुटुंब प्रमुख नसल्याचा दाखला दिला जातो.
आवश्यक कागदपत्रे:
  • अर्ज
  • कुटुंब प्रमुख मृत्यू प्रमाणपत्र

प्रक्रिया :
  • चौकशी व खात्री करून प्रमाणपत्र दिले जाते.
शुल्क: निःशुल्क